रणजीचा रणसंग्राम : विदर्भाचा विजय, तर मुंबई, महाराष्ट्राचे सामने अनिर्णित

रणजी करंडक स्पर्धेच्या रणसंग्रामात महाराष्ट्राच्या तीन संघांचे सामने झाले. यात विदर्भाचा दणदणीत विजय, तर मुंबई आणि महाराष्ट्राचे सामने अनिर्णित राहिले.

By: | Last Updated: > Sunday, 12 November 2017 7:57 PM
Ranji Trophy 2017-18 latest updates

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या रणसंग्रामात महाराष्ट्राच्या तीन संघांचे सामने झाले.  यात विदर्भाचा दणदणीत विजय, तर मुंबई आणि महाराष्ट्राचे सामने अनिर्णित राहिले.   

siddesh-lad_pti_m

मुंबई विरुद्ध बडोदा

सिद्धेश लाडच्या झुंजार खेळीच्या जोरावर रणजी करंडकाच्या साखळी फेरीत मुंबईनं बडोद्याविरूद्धची लढत अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.  सिद्धेश लाडनं 238 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 71 धावांची खेळी करत मुंबईला पाचशेव्या रणजी सामन्यात डावाच्या पराभवापासून वाचवलं. क गटातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. बडोद्यानं पहिल्या डावात 575 धावांचा डोंगर उभारून  404 धावांची भक्कम आघाडी मिळवली होती. तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची 4 बाद 102 अशी दाणादाण उडाल्यानं बडोद्याला आज शेवटच्या दिवशी डावानं विजय मिळवण्याची संधी होती. मात्र सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक नायरच्या चिवट खेळीनं मुंबईनं 7 बाद 260 धावांची मजल मारत सामना अनिर्णित राखला.

मुंबई  171  आणि 260/7,   बडोदा  475/9 घोषित

motwani

महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे

अ गटातील महाराष्ट्र विरूद्ध रेल्वे रणजी सामना अनिर्णित राहिला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. पहिल्या डावातील 100 धावांच्या आघाडीनंतर महाराष्ट्रानं आपला दुसरा डाव 186 धावांवर घोषित करून रेल्वेला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या दिवशी खेळ संपला तेव्हा रेल्वेनं चौथ्या डावात 1 बाद 54 धावा केल्यानं हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पहिल्या डावात शतक ठोकणाऱा महाराष्ट्राचा रोहित मोटवानी सामनावीराचा मानकरी ठरला.

महाराष्ट्र   481  आणि  186/6 घोषित,   रेल्वे  381 आणि 54/1

CM1-405x270

विदर्भ विरुद्ध बंगाल

रणजी करंडकातील ड गटाच्या सामन्यात विदर्भनं बंगालवर दहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पश्चिम बंगालच्या कल्याणी शहरात हा सामना खेळवण्यात आला. अखेरच्या दिवशी ललित यादव आणि आदित्य सरवटेच्या प्रभावी माऱ्यासमोर बंगालचा दुसरा डाव 306 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे विजयासाठी विदर्भला केवळ 18 धावांचं लक्ष्य मिळालं. विदर्भनं हे लक्ष्य बिनबाद पार करत यंदाच्या रणजी मोसमातला तिसरा विजय साजरा केला. पहिल्या डावात 182 धावांची शानदार खेळी साकारणाऱ्या विदर्भच्या संजय रामस्वामीला सामनावीराचा बहुमान देऊन गौरवण्यात आलं.

विदर्भ   499  आणि  18/0,  बंगाल  207 आणि 306 

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ranji Trophy 2017-18 latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा

मिलान (इटली) : ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल

केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा
केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!
'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!

केप टाऊन : ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!
VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!
'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि

IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला
IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला

नागपूर:  भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत

टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती
टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती

नागपूर : जलद गोलंदाज असलेल्या अष्टपैलू खेळाडूचा टीम इंडियाला

स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले
स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले

कोल्हापूर/मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री

झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!
झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!

मुंबई : टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे.

कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार
कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार

मुंबई : बांगलादेश ‘अ’ संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20