निलंबनाच्या कारवाईनंतर जाडेजाचा फिल्मी डायलॉग

कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर त्याच कसोटीतल्या अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर जाडेजाचा फिल्मी डायलॉग

कोलंबो : मैदानातील अखिलाडूवृत्तीसाठी टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जाडेजावर एका कसोटीसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जाडेजाने फिल्मी स्टाईलमध्ये ट्विटरद्वारे आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

जाडेजाने 'हम शरीफ क्या हुए सारी दुनिया ही बदमाश हो गई’ या शाहरुख खानच्या डायलॉगने त्याच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. या डायलॉगसोबत जाडेजाने कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही. मात्र त्याने अप्रत्यक्षपणे निलंबनावर नाराजी व्यक्त केली.

https://twitter.com/imjadeja/status/894460067264643072

कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर त्याच कसोटीतल्या अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

श्रीलंका दौऱ्यातल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जाडेजाला या कारवाईमुळे खेळता येणार नाही. कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता.

या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोलंबो कसोटीत जाडेजानेच श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्याने 152 धावांत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. रवीचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स काढून विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

संबंधित बातमी : अखिलाडीवृत्तीसाठी रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV