VIDEO: नजर हटी, दुर्घटना घटी..., पाहा रिषभ पंतचा भन्नाट रनआऊट!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 11 May 2017 12:34 PM
VIDEO: नजर हटी, दुर्घटना घटी..., पाहा रिषभ पंतचा भन्नाट रनआऊट!

कानपूर: नजर हटी, दुर्घटना घटी… अशी पाटी महामार्गांवर बऱ्याचदा पाहायला मिळते, आणि ही म्हण खुरीसुद्धा आहे. पण फक्त रस्त्यावरच नाही तर खेळाच्या मैदानातही असं घडू शकतं. याचाच प्रतत्य दिल्ली डेअरडेव्हिलसचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतलाही आला.

 

19 वर्षीय रिषभकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. पण अद्याप अनुभवाची कमी असल्याचं कालच्या सामन्यात दिसून आलं. काल ज्या पद्धतीनं रिषभनं आपली विकेट गमावली ती त्याच्यासाठी नक्कीच धडा शिकवणारी गोष्ट होती.

 

असा बाद झाला रिषभ!

 

कानपूरच्या मैदानात काल (बुधवार) गुजरातनं दिल्लीसमोर 196 धावाचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर संजून सॅमसन झटपट बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून त्यानं आशा उंचवल्या देखील. पण दुसऱ्याच चेंडूवर सगळ्या आशा धुळीसही मिळवल्या…

 

त्याचं नेमकं झालं असं की, रिषभनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर गोलंदाज प्रदीप सांगवाननं दुसऱ्या चेंडू थोडासा लेग साईडला टाकला. चेंडू रिषभच्या पॅडला लागून स्लीपमध्ये असणाऱ्या रैनाकडे गेला. त्याचवेळी गोलंदाजानं एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. तेव्हा रिषभचं सारं लक्ष त्याच्याकडेच गेलं. पंचानी त्याला नाबाद ठरवलं. त्यावेळी करुण नायर धाव घेण्याच्या तयारीत होता. रिषभनं हात दाखवत त्याला थांबण्याचा इशारा केला. पण याचवेळी स्वत: रिषभ मात्र, क्रिझच्या बाहेर होता. हीच संधी रैनानं साधली. रिषभ क्रिझमध्ये नाही आणि त्याची पाठ आपल्याकडे असल्याचं पाहून रैनानं चेंडू थेट स्टम्पवर मारला… अन् इथंच रिषभचा खेळ खल्लास झाला…

 

रिषभनं बॅट क्रिझमध्ये टेकवण्याआधीच रैनानं फेकलेल्या चेंडूनं स्टम्पचा वेध घेतला होता. त्यामुळे पंचांच्या निर्णयाची वाटही न पाहता रिषभनं निमूटपणे पॅव्हेलियनची वाट धरली…

 

रिषभची पुन्हा तशीच चूक!

 

रिषभ अशा पद्धतीनं बाद होणं ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशाच पद्धतीनं बाद झाला होता. मागील वर्षी खेळवण्यात आलेला अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिषभ असाच रनआऊट झाला होता. वेस्टइंडिज विरुद्ध सामन्यात सामन्यातील चौथ्याच चेंडूवर रिषभ रनआऊट झाला होता आणि हाच मॅचचा टर्निंग पॉईंटही ठरला होता.
त्यावेळी रिषभ वेगवान गोलंदाजाला क्रिझच्या बाहेर उभा राहून खेळत होता. जोरदार फटका मारण्याचा नादात तो आणखी पुढेही आला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही आणि विकेटकिपरच्या हातात गेला. त्यावेळीही रिषभ बेफिकीरपणे क्रिझच्या बाहेरच उभा होता. विंडीजचा विकेटकिपर इमलाचने चतुरपणे चेंडू थेट स्टम्पवर मारला आणि रिषभला बाद केलं. अंतिम सामन्यात अशापद्धतीनं विकेट गमावल्यानं त्याचा फटका संघाला बसला. अंडर 19 विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडिजनं पाच गडी राखून जिंकला.

 

VIDEO:

 

 

First Published: Thursday, 11 May 2017 12:33 PM

Related Stories

मुंबई इंडियन्सचा फील्डिंग कोच जाँटी ऱ्होड्सला पुत्रप्राप्ती
मुंबई इंडियन्सचा फील्डिंग कोच जाँटी ऱ्होड्सला पुत्रप्राप्ती

मुंबई : मुंबई इंडियन्सनं हैदराबादच्या रणांगणात आयपीएलच्या

मुंबई इंडियन्ससाठी देवाचा धावा करणाऱ्या 'या' आजीबाई आहेत..
मुंबई इंडियन्ससाठी देवाचा धावा करणाऱ्या 'या' आजीबाई आहेत..

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि पुण्यात रंगलेला अंतिम

'दंगल'ची भारतापेक्षा चीनमध्ये कमाई, छप्पर फाड के गल्ला
'दंगल'ची भारतापेक्षा चीनमध्ये कमाई, छप्पर फाड के गल्ला

मुंबई : अभिनेता आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाने चीनमध्ये अक्षरश:

आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!
आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई: आयपीएलचा अंतिम सामना काल (रविवार) अतिशय रंजक झाला. अवघ्या एका

IPL: शेवटच्या क्षणी रोहितचा गोलंदाजांना 'खास' सल्ला!
IPL: शेवटच्या क्षणी रोहितचा गोलंदाजांना 'खास' सल्ला!

हैदराबाद: आयपीएलच्या 10व्या मोसमात मुंबई इंडियन्सनं अतिशय थरारक

मुंबईला विजेतेपद, मात्र ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!
मुंबईला विजेतेपद, मात्र ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!

हैदराबाद : आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सने विजेतेपद आणि

मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलर न्यूड, व्हिडिओ व्हायरल
मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलर न्यूड, व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुंबईने पुण्यावर अवघ्या एका धावेनं विजय मिळवल्यांनतर

IPL: मुंबई-पुणे सामन्यातील शेवटच्या षटकातील थरार!
IPL: मुंबई-पुणे सामन्यातील शेवटच्या षटकातील थरार!

हैदराबाद: आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई

‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150% वाढ करा, कुंबळे-कोहलीची मागणी
‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150% वाढ करा, कुंबळे-कोहलीची...

मुंबई: बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्या ‘अ’ श्रेणीतल्या

सारसबाग v/s राणीची बाग, सोशल मीडियावर विनोदाचा पूर
सारसबाग v/s राणीची बाग, सोशल मीडियावर विनोदाचा पूर

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि पुणे हे दोन संघ