35 चेंडूत 100 धावा, इंदूरच्या मैदानात ‘हिट’मॅनचं वादळ!

श्रीलंकेविरुद्ध तुफान फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्मानं दुसऱ्या टी-20 सामन्यातही जबरदस्त फटकेबाजी केली. रोहित शर्मानं अवघ्या 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं.

35 चेंडूत 100 धावा, इंदूरच्या मैदानात ‘हिट’मॅनचं वादळ!

इंदूर : श्रीलंकेविरुद्ध तुफान फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्मानं दुसऱ्या टी-20 सामन्यातही जबरदस्त फटकेबाजी केली. रोहित शर्मानं अवघ्या 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं. त्यानं एकाच ओव्हरमध्ये चार षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला. एक मोठा फटका मारण्याचा नादात तो  118 धावांवर बाद झाला.

पण या शतकामुळे रोहितनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-20च्या इतिहासात रोहीत शर्मानं द. आफ्रिकेच्या डेव्हिड मीलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. डेव्हिड मिलरनंही 35 चेंडूत शतक झळकावलं होतं.

रोहित शर्मानं जेव्हा हे विक्रमी शतक झळकावलं त्यावेळी त्याची पत्नी रितिका ही देखील मैदानात उपस्थित होती. याआधी रोहितनं आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच द्विशतक ठोकलं होतं. त्यावेळी देखील रितिका मैदानात होती. आज पुन्हा एकदा रोहितनं आपल्या पत्नीसमोर शानदार शतक झळकावलं.

या सामन्यात सुरुवातीपासूनच रोहितनं आक्रमक फलंदाजी करत लंकेच्या गोलंदाजांना नामोहरम केलं. त्याला केएल राहुलनं देखील चांगली साथ दिली.

दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कारण सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलनं लंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. रोहित शर्मानं विक्रम शतक झळकावताना तब्बल 12 चौकार आणि 10 षटकार ठोकले.

हा सामना इंदूरच्या होळकर मैदानावर खेळवण्यात येत आहे. पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्या सामन्यात 93 धावांनी मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे टीम इंडियाच्या शिलेदारांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rohit sharma fastest hundred in t20 vs Sri lanka latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV