तिरंगी टी-20 मालिकेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर?

विराट कोहलीला विश्रांती दिल्यास टीम इंडियाची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

तिरंगी टी-20 मालिकेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर?

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया 6 मार्चपासून बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध तिरंगी टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यानंतर बीसीसीआय काही निवडक खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांना टी-20 तिरंगी  मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, असं वृत्त आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्यास टीम इंडियाची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

टी-20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे कर्धारपदाचा चांगला अनुभव आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याच्याच कारकीर्दीत मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे.

भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात पहिल्यांदाच तिरंगी टी-20 मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका श्रीलंकेच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. मालिकेत भारताचा पहिलाच सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

तिनही संघ एकमेकांविरोधात प्रत्येक दोन सामने खेळतील आणि त्यानंतर टॉपचे दोन संघ अंतिम सामन्यात भिडतील. या मालिकेत एकूण 7 सामने खेळवण्यात येणार आहेत.

संबंधित बातमी :

6 मार्चपासून टीम इंडिया तिरंगी मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rohit-likely-to-lead-india-in-upcoming t20 tri series in sri lanka
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV