रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया पहिल्या वन डेसाठी उतरणार!

भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशालामध्ये खेळवला जाणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया पहिल्या वन डेसाठी उतरणार!

धर्मशाला : श्रीलंकेविरुद्ध कसोटीतील विक्रमी मालिका विजयानंतर आता तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशालामध्ये खेळवला जाणार आहे.

या मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहे. हार्दीक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झालं असून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि महेन्द्रसिंग धोनी या अनुभवी शिलेदारांवर प्रामुख्याने फलंदाजीची मदार राहील.

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आजपर्यंत भारतात झालेल्या नऊ वन डे मालिकांपैकी आठ मालिका टीम इंडियाने आपल्या खिशात घातल्या आहेत तर एक मालिका अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेनंतर आता वन डेतही श्रीलंकेला मात देण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.

रोहित शर्माकडे टीम इंडियाची धुरा

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तो भारताचा विजयी रथ कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rohit sharma to lead team India in first one day against SL
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV