पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल

आपल्या पंतप्रधानांचं शानदार भाषण. अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असलेले जागतिक मुद्दे त्यांनी उचलून धरले, असं रोहित म्हणाला होता.

पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे रोहित शर्मा ट्रोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावोसमध्ये केलेल्या भाषणाचं कौतुक करणं क्रिकेटपटू रोहित शर्माला चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटराईट्सनी रोहितला आपल्या परफॉर्मन्सकडे लक्ष देण्याचा सल्ला देत ट्रोल केलं आहे.

'कोहलीने पुढच्या सामन्यात ठेवावं म्हणून रोहितने मोदींची तारीफ केली', इथपासून 'टीममध्ये आहेस की नाही, ते सांग' असे नानाविध सल्ले आणि प्रश्न रोहितला विचारण्यात आले.

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची रोहित शर्माने ट्विटरवरुन तारीफ केली होती. 'आपल्या पंतप्रधानांचं शानदार भाषण. अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असलेले जागतिक मुद्दे त्यांनी उचलून धरले. जेव्हा असं व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती बोलते, तेव्हा अख्खं जग ऐकतं' असं रोहित म्हणाला होता.

Troll Rohit Sharma Tweet 4

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरी कसोटी मालिका जोहान्सबर्गमध्ये सुरु आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये हार पत्करुन मालिका गमवल्यानंतर व्हाईटवॉश टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न सुरु आहे.

Troll Rohit Sharma Tweet 1  Troll Rohit Sharma Tweet 3 Troll Rohit Sharma Tweet 5

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rohit Sharma trolled for praising Narendra Modi’s speech in Davos latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV