गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात 'कच्चा'

ट्विटरवर 80 लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्यानिमित्त रोहित शर्माने एक व्हिडिओ शेअर केला. मात्र यामध्ये त्याने मोठी चूक केली.

गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात 'कच्चा'

मुंबई : टीम इंडियाचा उपकर्णधार हिटमॅन रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानात त्याच्या दमदार खेळासाठी ओळखला जातो. वन डेत दोन द्विशतक ठोकणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. मैदानावरील त्याच्या कौशल्याबाबतीत कुणी काहीही शंका घेऊ शकणार नाही. मात्र गणितात तो जरासा कच्चा आहे.

ट्विटरवर 19 डिसेंबरला रोहित शर्माचे 8 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले. त्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओमध्ये, एका फळ्यावर 8 लिहिल्यानंतर त्यापुढे रोहितने सहा वेळा शून्य लिहिला. त्यामुळे हा आकडा 80 लाख झाला. मात्र 8000000 लिहिल्यानंतरही त्याने त्यापुढे M लिहिलं. म्हणजेच हा आकडा 80 लाख मिलियन झाला. त्यामुळे मैदानात गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात जरासा कच्चा निघाला.

https://twitter.com/ImRo45/status/910140252584534017

रोहित शर्माने 21 कसोटी, 168 वन डे आणि 63 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व खेळले आहेत. कसोटीत रोहित शर्माच्या नावावर 7 अर्धशतकं, 2 शतकं आणि 1184 धावा आहेत. वन डेत 6033 धावा त्याच्या नावावर आहेत, ज्यामध्ये 34 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे. तर टी-20 मध्ये त्याच्या खात्यात 1373 धावा आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV