25 वर्षीय क्रिकेटरच्या किडनी निकामी, आरपी सिंहकडून मदतीचा हात

25 वर्षीय क्रिकेटर आदित्य पाठक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. अंडर-16 पॉली उम्रीगर चषक खेळणारा आदित्य पाठकच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत.

25 वर्षीय क्रिकेटरच्या किडनी निकामी, आरपी सिंहकडून मदतीचा हात

नवी दिल्ली : 25 वर्षीय क्रिकेटर आदित्य पाठक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. अंडर-16 पॉली उम्रीगर चषक खेळणारा आदित्य पाठकच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याची प्रकृती खूपच खराब आहे. अशावेळी त्याच्या मदतीसाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप (आरपी) सिंह पुढे आला आहे.

आदित्यच्या उपचारांसाठी त्याच्या कुटुंबानं आपलं राहतं घरही गहाण टाकलं आहे. अशावेळी क्रिकेटर आरपी सिंहनं आदित्यला मदत करावी यासाठी ट्वीटरवरुन आवाहन केलं आहे.


 

या ट्वीट सोबत आरपी सिंहनं एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीचं कात्रणही शेअर केलं आहे. यामध्ये सर्व बँक डिटेलही देण्यात आले आहेत. तसेच आदित्यला जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहनही त्यानं केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली आदित्यची एक किडनी निकामी झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर आजपर्यंत उपाय सुरु आहेत.

दरम्यान, आदित्य पाठकनं उत्तर प्रदेशच्या कानपूर क्रिकेट असोसिएशनसाठी अंपायरिंगही केलं आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV