मुंबई विद्यापीठाच्या टी-20 मध्ये रुद्र धांडेचं नाबाद द्विशतक

मुंबई विद्यापीठाच्या टी-20 मध्ये रुद्र धांडेचं नाबाद द्विशतक

मुंबई : रिझवी कॉलेजच्या रुद्र धांडेनं आंतरकॉलेज ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात नाबाद द्विशतक साजरं करण्याचा पराक्रम गाजवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीनं आयोजित अबिस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत रुद्र धांडेनं दालमिया कॉलेजविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम गाजवला.

रुद्रने 67 चेंडूंत नाबाद 200 धावांची खेळी उभारली. माटुंग्याच्या दडकर मैदानातल्या सामन्यात रुद्र धांडेनं 21 चौकार आणि 15 षटकारांची बरसात केली.

रुद्रच्या या कामगिरीनं रिझवीला 20 षटकांत दोन बाद 322 धावांची मजल मारून दिली. प्रतिस्पर्धी दालमिया कॉलेजचा डाव अकराव्या षटकांत 75 धावांत गडगडला.

दरम्यान, रिझवीच्या रुद्र धांडेचं नाबाद द्विशतक हा ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधला विक्रम ठरू शकणार नाही. कारण  दिल्लीतल्या फ्रेंडस प्रीमियर लीगमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात मोहित अहलावत नावाच्या फलंदाजानं नाबाद 300 धावांची खेळी केली होती.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV