सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

By: | Last Updated: > Friday, 19 May 2017 1:36 PM
Sachin Tendukar meets Narendra Modi in Delhi latest news update

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट मास्टरब्लास्टरने केलं आहे.

‘जो खेले वही खिले,’ हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचंही सचिनने सांगितलं. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला. त्याचा जीवन प्रवास आणि कामगिरी 125 कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहे. सचिनच्या या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.

First Published:

Related Stories

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’

शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज
शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज

मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन

जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर
VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर

मुंबई : काजोल आणि धनुष यांची भूमिका असलेल्या ‘वेलै इल्ला

मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक
मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक

मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी

बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...
बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...

मुंबई : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवरची कमाई

सैराट फेम आर्ची 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार!
सैराट फेम आर्ची 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार!

पुणे : सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू 10 वीनंतर पुढचं शिक्षण