VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर सचिनची फटकेबाजी, व्हिडीओ व्हायरल

माजी कसोटीवीर विनोद कांबळीनं सचिनचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर सचिनची फटकेबाजी, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्व स्तरावरच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला, त्याला आता पाच वर्षे व्हायला आली आहेत. पण सचिनची फलंदाजी करण्याची खुमखुमी काही कमी झालेली नाही. सचिनचा दोस्त आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळीनं सचिनचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सचिनची हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळतानाची ही दृश्यं रात्री उशिराची आहेत. तसंच मेट्रोच्या खोदकामासाठी व्यापलेला रस्ताही या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

खुद्द सचिन तेंडुलकर रस्त्यावर फलंदाजी करत असल्याचं अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. रात्री रस्त्यावर खेळणारी मुलं पाहून खुद्द सचिनंही स्वत:ला यावेळी रोखू शकला नाही....म्हणून मी सचिनचा हा व्हिडीओ पोस्ट केला : विनोद कांबळी

सचिन तेंडुलकरचा हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या विनोद कांबळीशी जेव्हा एबीपी माझाने संपर्क साधला त्यावेळी तो म्हणाला की,  ‘हा व्हिडीओ आपल्याला एका मित्राने पाठवला. त्यानंतर तो मी सोशल मीडियावर पोस्ट केला. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. अनेकांना सचिनला पाहण्याची उत्सुकता असते. अशावेळी खुद्द सचिन रस्त्यावर रात्रीच्या वेळी क्रिकेट खेळताना पाहून मलाही आश्चर्य वाटलं. म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट केला.’ असं विनोद म्हणाला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sachin Tendulkar played a cricket on the road in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV