'नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला टाक बाऊन्सर'

'नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला टाक बाऊन्सर'

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील महामुकाबला काही तासांवर येऊन ठेपला आहे. रविवारी फायनल सामना होत आहे.

भारत-पाकिस्तानचा सामना आला की, प्रतिष्ठेचा प्रश्न आपोआप साईडट्रॅक होतो आणि ऐरणीवर येतो तो अस्मितेचा मुद्दा. कोण जिंकणार क्रिकेटचं बॅटलफिल्ड, भारत की, पाकिस्तान?

हा प्रश्न असला तरी काही रेकॉर्ड,आकडेवारी आणि काही किस्सेही नजरेसमोर येतात.

असाच एक सेहवागचा किस्सा आहे, जो क्रिकेटविश्व कधीही विसरु शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे मैदानावर होते. समोर गोलंदाजीसाठी शोएब अख्तर होता. त्यावेळी काय घडलं होतं, हे सेहवागने एका टीव्ही शोमध्ये सांगितलं होतं.

सचिनची कहाणी आणि सेहवागची जुबानी झाली ती एका टीव्ही शोमध्ये, त्या टीव्ही शोमध्ये अभिनेता शाहरुख खानने सचिनच्या खेळाविषयी सेहवागला विचारलं, त्यावर सेहवागने शोएब अख्तरचा एक किस्सा सांगितला.

सेहवाग म्हणाला, "मी बॅटिंग करत होतो आणि शोएब अख्तर बोलिंग करत होता. पण, शोएब प्रत्येक बॉल बाऊन्सर टाकत होता. शोएब मला म्हणाला होता ‘हूक मारके दिखा’? मी शोएबला तेव्हा उत्तर दिलं, नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला सांग, तो मारुन दाखवेल.

त्यावेळी नॉन स्ट्राईकर एंडवर सचिन तेंडुलकर उभा होता आणि सचिनने पुढच्याच ओव्हरला शोएबच्या बाऊन्सरवर सिक्सर लगावला. तेव्हा सेहवाग शोएबला म्हणाला, बेटा बेटा होता है, और बाप बाप होता है.".

बाप बाप होता है....शोएब अख्तरला सेहवागच्या हटके शुभेच्छा !

VIDEO:

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV