सचिनकडून सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा'

टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा आज 39वा वाढदिवस आहे. याचनिमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही खास शैलीत सेहवागला शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनकडून सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा'

मुंबई : टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आज आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्तानं अनेकांनी सेहवागला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं खास शैलीत सेहवागला शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिननं ट्विटरवरुन सेहवागला चक्क ‘उलट्या शुभेच्छा’ दिल्या आहेत. सचिननं सेहवागला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. पण त्या शुभेच्छा देताना सचिननं एक खास पद्धत वापरली. सचिननं या शुभेच्छा देताना उलट्या अक्षरात ट्वीट केलं.

अशा पद्धतीनं शुभेच्छा देण्यामागे कारणही तसंच खास आहे. सचिनचं हे ट्वीट अनेकांनी रिट्विट केलं असून सोशल मीडियातही बरंच व्हायरल झालं आहे.

सचिन ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाला?

'वाढदिवसाच्या शुभेच्छा वीरु, नव्या वर्षाची चांगली सुरुवात होवो. मी जेव्हाही मैदानावर तुला काही सांगितलं तेव्हा-तेव्हा तू उलटंच केलंस. :P त्यामुळे आता माझ्याकडून देखील अशाच काही शुभेच्छा!

या ट्विटसोबत सचिननं एक हसणारा स्माईली देखील टाकला आहे.

दरम्यान, सचिनच्या या खास शुभेच्छांवर वीरुनंही खास आपल्या शैलीत सचिनचे आभार मानले आहेत.‘धन्यवाद देवा, वरचा सारं काही पाहतो आहे, हे फक्त ऐकलं होतं. पण आज मला समजलं की, तो खालच्यांसाठी लिहतो कसं.' असं ट्विट वीरुनं केलं आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV