अर्जुन तेंडुलकरच्या पाच विकेट्स, मुंबईचा शानदार विजय

अर्जुन तेंडुलकरने तीन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशविरुद्ध पाच विकेट्स आणि त्यानतंर आसामविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या.

अर्जुन तेंडुलकरच्या पाच विकेट्स, मुंबईचा शानदार विजय

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या पाच विकेट्सच्या जोरावर मुंबईने कूच बेहार अंडर-19 चषकात रेल्वे संघाला पराभूत केलं.

अर्जुनच्या शानदार कामगिरीची या मोसमातील ही तिसरी वेळ आहे. अर्जुन तेंडुलकरने तीन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशविरुद्ध पाच विकेट्स आणि त्यानतंर आसामविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या.

कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानात खेळलेल्या सामन्यात अर्जुनला पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली, पण त्याला यश मिळालं नाही. परंतु दुसऱ्या डावात कमबॅक करताना त्याने 11 षटकात 44 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या.

डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर रेल्वेचा संघ 136 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईचा एक डाव आणि 103 धावांनी विजय झाला.

याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यशवी भूपेंद्र जयसवालच्या द्विशतकामुळे मुंबईने 389 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रेल्वेचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. पहिल्या डावात ए वशिष्ठने 30 धावांच्या मोबदल्यात आठ विकेट्स घेतल्या होत्या.

दुसऱ्या डावात रेल्वेला सुरुवातीलाच दणके देत अर्जुनने चार विकेट्स घेतल्या. यानंतर डावातील नववी विकेट घेऊन आपले पाच विकेट्स पूर्ण केल्या.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sachin Tendulkar’s son Arjun shines for Mumbai victory in Cooch Behar Trophy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV