पाकिस्तानचा गोलंदाज सईद अजमलचा क्रिकेटला अलविदा

गोलंदाजीच्या स्टाईलमध्ये बदल केल्यानंतर त्याला पाकिस्तानकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

पाकिस्तानचा गोलंदाज सईद अजमलचा क्रिकेटला अलविदा

लाहोर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अखेरच्या सामन्यात विकेट घेणारा पाकिस्तानचा फिरकीपटू गोलंदाज सईद अजमलने निवृत्तीची घोषणा केली आहे. गोलंदाजीच्या स्टाईलमध्ये बदल केल्यानंतर त्याला पाकिस्तानकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या टी-20 मालिकेत अजमल अखेरचा सामना खेळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आता संघावर ओझं होण्याची इच्छा नाही. शिवाय संघातील माझ्या निवडीवरुन निवड समितीत काही वाद होण्यापूर्वीच मी हा कठोर निर्णय घेत आहे, असं अजमलने निवृत्तीची घोषणा करताना सांगितलं.

सईद अजमलने 2011 ते 2014 या काळात पाकिस्तानसाठी मॅच विनर म्हणून भूमिका निभावली. या दरम्यानच तो गोलंदाजांच्या आयसीसी वन डे रँकिंगमध्येही अव्वल स्थानावर कायम होता. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीनेच 2009 सालचा टी-20 विश्वचषक जिंकला होता.

अजमलने त्याच्या कारकीर्दीत 35 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं, ज्यामध्ये 178 विकेट घेतल्या. तर 113 वन डेमध्ये 184 आणि 64 टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 85 विकेट आहेत. अजमल अखेरचा 2015 साली बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात खेळला होता, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यानंतर त्याला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

सचिनवर केलेल्या वक्तव्यामुळे अजमल भारतीयांच्या आठवणीत राहिल. माझ्या हातून बाद झाल्यामुळेच सचिनने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला, असं अजमल सचिनला त्याच्या अखेरच्या वन डेत बाद केल्यानंतर गंमतीशीरपणे म्हणाला होता. अजमलने सचिनला 2012 च्या आशिया चषकात 48 धावांवर बाद केलं होतं, जो सचिनचा अखेरचा वन डे सामना होता.

अजमल भारताविरुद्ध खेळताना यशस्वी गोलंदाजांपैकी एक समजला जातो. भारताविरुद्ध खेळताना 10 वन डेमध्ये त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच गोलंदाजीच्या स्टाईलमुळे आयसीसीने त्याच्यावर बंदी घातली होती. मात्र नंतर त्याला क्लीन चिटही मिळाली होती.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Saeed ajmal announced retirement
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: saeed ajmal सईद अजमल
First Published:
LiveTV