झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!

भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि त्याचा सहकारी आशिष नेहराने या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्नानंतर कॉकटेल पार्टीचं होणार आहे.

झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!

मुंबई : टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सागरिक घाटगेसोबत एका घरगुती सोहळ्यात त्याने लगीनगाठ बांधली. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि त्याचा सहकारी आशिष नेहराने या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्नानंतर कॉकटेल पार्टीचं होणार आहे.

झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?


फोटो : सागरिका घाटगेविषयी 'या' सात गोष्टी तुम्हाला माहित आहेत?


मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये सोमवारी (27 नोव्हेंबर) 'चक दे इंडिया' स्टार सागरिका आणि झहीर खान यांच्या लग्नाचं रिसेप्शन असेल.

दुसरीकडे, टीम इंडियांचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचाही आज विवाह होणार आहे. बालमैत्रीण नुपूर नागरसोबत तो बोहल्यावर चढणार आहे.

कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारी

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sagarika Ghatge ties the knot with Zaheer Khan today
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV