सायनाची सिंधूवर मात, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूवर मात करत अजिंक्यपद पटकावलं.

सायनाची सिंधूवर मात, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद

नागपूर : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूवर मात करत अजिंक्यपद पटकावलं. अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सायनानं सिंधूचं कडवं आव्हान दोन सेट्समध्येच मोडीत काढलं.

सायना आणि सिंधूमधील या सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. यावेळी पहिल्या गेममध्ये सायनानं सिंधूवर 21-17 अशी मात केली. पण दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं सायनाला कडवं आव्हान दिलं. यावेळी सुरुवातील सिंधू आघाडीवर होती. पण नंतर सायनानं सिंधूला चुका करण्यास भाग पाडलं. ज्यामुळे सायनानं आपली पिछाडी भरुन काढणं सोपं गेलं. शेवटी सायनानं हा गेम 27-25नं जिंकत सामनाही आपल्या खिशात घातला.

सायनानं या सामन्यात सिंधूचा 21-17, 27-25 असा पराभव केला. या विजयासह सायनानं तिसऱ्यांदा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. याआधी 2006 आणि 2007 ला सायनानं विजेतेपद पटकावलं होतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Saina lift her third national title beats P V Sindhu latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV