जयसूर्याची अवस्था बिकट, कुबड्यांशिवाय चालता येईना!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक जमाना आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं जागवणारा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे.

जयसूर्याची अवस्था बिकट, कुबड्यांशिवाय चालता येईना!

कोलंबो (श्रीलंका) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक जमाना आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं जागवणारा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे. जयसूर्याच्या दुखापतीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, त्याला कुबड्यांचा आधार घेऊन चालावं लागत आहे.

जयसूर्याचा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रीलंकन  जयसूर्या गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. आता तर त्याला कुबड्यांशिवाय चालताही येत नाही. सध्या त्याच्या  गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज असून, त्यासाठी तो मेलबर्नला जाणार आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जयसूर्या दोनदा श्रीलंका क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष झाला होता. पण 2017 मध्ये द. आफ्रिका आणि भारताकडून श्रीलंकेचा मानहानीकारक पराभव झाला. त्यानंतर जयसूर्यानं अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

48 वर्षीय जयसूर्या 2011 मध्ये निवृत्त झाला. तो श्रीलंकेच्या संघाचा आधारस्तंभ मानला जायचा. भलाभल्या गोलंदाजांना त्यानं आपल्या फलंदाजीनं नामोहरम केलं होतं.

४८ वर्षांच्या जयसूर्यानं ४३३ वन डे आणि ११० कसोटी सामन्यांत श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या खात्यावर वन डेत १३,४३० तर कसोटीत ६९७३ धावा जमा आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sanath jayasuriya unable to walk without crutches latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV