पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांचा राजीनामा

संदीपआप्पा भोंडवे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या कुस्तीत आदराची भावना आहे. ते स्वत: राष्ट्रीय दर्जाचे पैलवान आहेत. त्यामुळे कुस्तीतल्या नियमांची त्यांना चांगली जाण आहे.

SandeepAappa Bhondve resign as Pune district wrestling union president

मुंबई : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धा समिती अध्यक्षपदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कारभारावर नाराज होऊन भोंडवे यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं.

महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातली प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती अवघ्या महिन्यावर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भुगावमध्ये 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भोंडवे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीत खळबळ निर्माण झाली आहे.

संदीपआप्पा भोंडवे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या कुस्तीत आदराची भावना आहे. ते स्वत: राष्ट्रीय दर्जाचे पैलवान आहेत. त्यामुळे कुस्तीतल्या नियमांची त्यांना चांगली जाण आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या मोठ्या कुस्ती स्पर्धेच्या कालावधीत आखाड्याजवळ खंबीरपणे उभं राहून वाद मिटवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो.

त्यामुळे भोंडवे यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या कुस्तीच्या दृष्टीने धक्कादायक आहे.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:SandeepAappa Bhondve resign as Pune district wrestling union president
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

शून्यावर बाद होऊनही केएल राहुलचा विक्रम!
शून्यावर बाद होऊनही केएल राहुलचा विक्रम!

कोलकाता : सलग सात डावांमध्ये अर्धशतक झळकवून विश्वविक्रमाची बरोबरी

LIVE : पावसामुळे खेळ थांबला, पुजाराचा संघर्ष सुरुच
LIVE : पावसामुळे खेळ थांबला, पुजाराचा संघर्ष सुरुच

कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या कोलकातामधील पहिल्या कसोटीत

ईडन गार्डन्सवर लकमलची लकाकी, 6 षटकं, 6 निर्धाव, 3 विकेट्स
ईडन गार्डन्सवर लकमलची लकाकी, 6 षटकं, 6 निर्धाव, 3 विकेट्स

कोलकाता : कोलकात्याच्या पहिल्या कसोटीत पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे

मुंबईने मला सर्व काही दिलं, मग मी का सोडू?: हार्दिक पंड्या
मुंबईने मला सर्व काही दिलं, मग मी का सोडू?: हार्दिक पंड्या

मुंबई: गेल्या अनेक दिवासांपासून अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई

IPL 2018 : चेन्नई परतणार, पण धोनी रैनाला सोडणार?
IPL 2018 : चेन्नई परतणार, पण धोनी रैनाला सोडणार?

मुंबई: आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्जच्या

भारत-श्रीलंका संघामधील पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट
भारत-श्रीलंका संघामधील पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट

कोलकाता : भारत आणि श्रीलंका संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला

''एकाच संघासोबत तीन महिन्यात दोनदा खेळणं प्रेक्षकांसाठी ओव्हरडोस''
''एकाच संघासोबत तीन महिन्यात दोनदा खेळणं प्रेक्षकांसाठी ओव्हरडोस''

कोलकाता : केवळ तीन महिन्याच्या आतच श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा

आशिष नेहरा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत नव्या पदार्पणासाठी सज्ज
आशिष नेहरा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत नव्या पदार्पणासाठी सज्ज

कोलकाता : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आशिष

केवळ 2 धावा करताच विराट दिग्गजांना मागे टाकणार
केवळ 2 धावा करताच विराट दिग्गजांना मागे टाकणार

कोलकाता : विजयरथावर सवार असलेली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सचं रणांगण सज्ज झालं आहे भारत