सरफराझ अहमद पाकिस्तानचा टी 20 कर्णधार

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 5 April 2016 2:42 PM
सरफराझ अहमद पाकिस्तानचा टी 20 कर्णधार

इस्लामाबाद: शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानच्या ट्वेन्टी20 संघाची धुरा आता यष्टीरक्षक फलंदाज सरफराझ अहमदच्या हाती सोपवण्यात आली आहे.

आशिया चषक आणि त्यापाठोपाठ ट्वेन्टी ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानवर साखळी फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर आफ्रीदीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता सरफराज अहमदची पाकिस्तानच्या ट्वेन्टी20 संघाच्या कर्णधारपदी नेमणूक केल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं जाहीर केलं.

सरफराझनं याआधी पाकिस्तानच्या वन डे आणि ट्वेन्टी20 संघांचं उपकर्णधारपद सांभाळलं होतं. 28 वर्षीय सरफराझनं आजवर 58 वन डे सामन्यांत 53 झेल टिपले असून 17 वेळा फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे. वन डेत त्यानं 1077 धावाही केल्या आहेत. तर ट्वेन्टी20त सरफराझच्या नावावर 9 झेल, 2 स्टम्पिंग्ज, आणि 291 धावा जमा आहेत.

त्याशिवाय सरफराझनं 21 कसोटी सामन्यांमध्ये 1296 धावा केल्या असून 46 झेल टिपले आहेत आणि 17 वेळा फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे.

First Published: Tuesday, 5 April 2016 2:41 PM

Related Stories

कोलकात्याची दिल्लीवर मात, गुणतालिकेत पुन्हा अव्वल
कोलकात्याची दिल्लीवर मात, गुणतालिकेत पुन्हा अव्वल

कोलकाता : कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी

हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू
हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू

पुणे : देशभरातून पुण्यात दाखल झालेल्या पैलवानांनी बाबूराव सणस

अकमल-जुनैदचा वाद चव्हाट्यावर, पीसीबीकडून कारवाईची शक्यता
अकमल-जुनैदचा वाद चव्हाट्यावर, पीसीबीकडून कारवाईची शक्यता

इस्लामाबाद : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज उमर अकमल आणि गोलंदाज

सुकमा हल्ला : गंभीर शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
सुकमा हल्ला : गंभीर शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीरने अतिशय

आयपीएलमध्ये धोनीच्या विक्रमाशी उथप्पाची बरोबरी
आयपीएलमध्ये धोनीच्या विक्रमाशी उथप्पाची बरोबरी

पुणे : कोलकात्याचा यष्टिरक्षक रॉबिन उथप्पानं पुण्याच्या तीन

प्रेग्नन्सी गुप्त ठेवायची होती, पण... सेरेना विल्यम्सची कबुली
प्रेग्नन्सी गुप्त ठेवायची होती, पण... सेरेना विल्यम्सची कबुली

न्यूयॉर्क : महिला टेनिसची सुपरस्टार सेरेना विल्यम्सनं आपण

अडचणीतील सुपरफॅनला सचिनची तातडीची मदत
अडचणीतील सुपरफॅनला सचिनची तातडीची मदत

मुंबई: इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर करण्याची

जेट एअरवेजच्या पायलटवर हरभजनचा संताप, वर्णद्वेषाचा आरोप
जेट एअरवेजच्या पायलटवर हरभजनचा संताप, वर्णद्वेषाचा आरोप

मुंबई:  टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहने जेट एअरवेजच्या

Champions Trophy 2017: मुदत संपली, पण अजूनही भारतीय संघाची घोषणा नाही
Champions Trophy 2017: मुदत संपली, पण अजूनही भारतीय संघाची घोषणा नाही

मुंबई: इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर

आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलावरुन वाद
आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलावरुन वाद

मुंबई: आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसूल वाटून घेण्याच्या पद्धतीवरून