... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग

पहिल्या दिवसाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या ख्रिस गेलवर दुसऱ्या दिवशी बोली लावण्यात आली.

... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग

बंगळुरु : आयपीएल लिलावात असा एक आश्चर्यकारक क्षण आला, जेव्हा एकाही फ्रंचायझीने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर बोली लावली नाही. मात्र पहिल्या दिवसाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या ख्रिस गेलवर दुसऱ्या दिवशी बोली लावण्यात आली. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला बेस प्राईस 2 कोटींमध्ये खरेदी केलं.

गेलला खरेदी करताच सर्व फ्रँचायझींनी पंजाबचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. मात्र त्याचं संघात असणंच पुरेसं आहे, अशी प्रतिक्रिया पंजाबचा मेंटॉर आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिली. सलामीवीर फलंदाज म्हणून तो कोणत्याही संघासाठी धोकादायक आहे, असं सेहवाग म्हणाला.

संघ व्यवस्थापन गेलकडे पर्यायी सलामीवीर फलंदाज म्हणून पाहत आहे. ''गेलची ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे. त्याच्यावर संघाने दोन कोटी रुपये खर्च केले, मात्र मार्केटिंग स्ट्रॅटेजीनुसार हे फायदेशीर आहे. तो जास्त सामने खेळू शकणार नाही. मात्र एक बॅकअप सलामीवीर फलंदाज म्हणून संघात असेल,'' असं सेहवाग म्हणाला.

ख्रिस गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजारपेक्षा जास्त धावा आणि 20 शतकं आहेत. जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये गेलने चांगली कामगिरी केली आहे. मात्र गेल्या आयपीएल मोसमात अपयशी ठरल्याने त्याच्याबाबत फ्रँचायझी अनुत्सुक दिसून आले.

संबंधित बातम्या :

आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी


... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही


आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा


जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV