... तर मोहम्मद शमीच्या करिअरला पूर्ण विराम मिळणार!

महिलांशी अनैतिक संबंध, मारहाण, पाकिस्तान कनेक्शन आणि मॅच फिक्सिंगसारख्या पत्नी हसीन जहाच्या आरोपांनी शमी स्वतःच ‘बोल्ड’ झाला आहे. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे हे षडयंत्र असल्याचा आरोप शमीने केला आहे.

... तर मोहम्मद शमीच्या करिअरला पूर्ण विराम मिळणार!

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढतच आहेत. महिलांशी अनैतिक संबंध, मारहाण, पाकिस्तान कनेक्शन आणि मॅच फिक्सिंगसारख्या पत्नी हसीन जहाच्या आरोपांनी शमी स्वतःच ‘बोल्ड’ झाला आहे. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे हे षडयंत्र असल्याचा आरोप शमीने केला आहे.

हसीन जहाने फोनवरील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लीप जारी केली, ज्यामध्ये शमीची पोलखोल झाली. ऑडिओ क्लीपमध्ये पाकिस्तानी तरुणी आलिश्बाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये शमीने हे स्वीकारलं आहे की, आलिश्बाचा दुबईसाठीचा व्हिसा त्यानेच केला होता.

या सर्व आरोपांनंतर मोहम्मद शमीच्या करिअरला पूर्ण विराम मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तो दोषी आढळला तर त्याला किती शिक्षा होऊ शकते, असाही प्रश्न आहे. शमीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

शमीवर या कलमांतर्गत आरोप, शिक्षेची तरतूद

मोहम्मद शमीवर आयपीसी कलम 498A (पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून महिलेचा छळ), 323 (मारहाण), 307(जीवे मारण्याचा प्रयत्न), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी), 328 (गुन्हा करण्याच्या हेतूने विष पाजणे) आणि कलम 34 (गुन्हेगारी कट रचणं) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 498A – या कलमानुसार, महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

कलम 323- दोषी आढळल्यास जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद

कलम 376 – किमान 7 वर्षे आणि जास्तीत जास्त 10 वर्षे तुरुंगवासाची तरतूद

कलम 506- दोन वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही

कलम 328 – दोषी आढळल्यास 10 वर्षे तुरुंगवास आणि दंड

पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर तपास सुरु केला आहे. शिवाय शमीवर आता अटकेची टांगती तलवार आहे. शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर अनेक आरोप तिने केले.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mohammed shami booked after wife hasin jahan allegation Indian cricketer career derail
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV