शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Wednesday, 15 March 2017 3:04 PM
शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं शशांक मनोहर यांनी सांगितलं.

आयसीसीच्या प्रशासकीय ढाचात बदल झाल्यानंतर, आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवडून आलेले शशांक मनोहर हे पहिलेच पदाधिकारी होते. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत ही दोन वर्षांची होती. पण मनोहर यांनी केवळ दहा महिन्यांमध्येच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मनोहर यांनी आपला राजीनामा ई-मेलने आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठवला आहे. पण या निर्णयामागे कोणतं एखादं विशिष्ट कारण आहे का, हे आपल्या राजीनामापत्रात त्यांनी नमूद केलेलं नाही.

महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

…म्हणून मनोहरांनी राजीनामा दिला!

शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यापासून, बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अँड क्रिकेट बोर्ड यांची आयसीसीतली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नेटाने लढा दिला. बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ईसीबी यांना आयसीसीच्या नफ्यात अधिक वाटा देणारा ठराव 2014 सालापासून चर्चेला होता. आयसीसी संलग्न तीन बड्या असोसिएशन्सचा तो प्रयत्न मोडून काढण्यासाठी मनोहर यांनी कंबर कसली होती.

यासंदर्भात आयसीसीच्या एप्रिलमधल्या बैठकीत घटनात्मक आणि आर्थिक सुधारणांचा विचार होण्याची चिन्हं होती. त्यासाठी किमान दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. पण बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वेला आपल्या बाजूने वळवून मनोहरांचा प्रयत्न हाणून पाडण्याची तयारी केली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपला स्वाभिमानी बाणा जपला असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या

शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन!

BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर

शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष?

First Published: Wednesday, 15 March 2017 1:09 PM

Related Stories

82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव
82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव

मुंबई : धर्मशाला कसोटीनंतर भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या

अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू
अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा

ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'
ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'

धर्मशाला : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला उजव्या खांद्याच्या

टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!
टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!

शिमला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे

IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला
IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला

धर्मशाला : भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना

शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार
शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार

मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे

...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली
...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली

मुंबई : “जर मी 100 टक्के फिट असेन तरच खेळेन,” असं स्पष्टीकरण टीम

पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?
पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?

धर्मशाला: ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यातली पुण्याची पहिली कसोटी

विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता
विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता

धरमशाला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धरमशालाच्या चौथ्या