कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शूटिंगऐवजी टी20 क्रिकेट?

बर्मिंगहॅममध्ये शूटिंगसाठी योग्य त्या सुविधा नसल्यामुळे हा खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शूटिंगऐवजी टी20 क्रिकेट?

मुंबई : 2022 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधून शूटींग हा खेळ वगळला जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी क्रिकेटचा समावेश करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.

2022 साली इंग्लडमधील बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10 अनिवार्य खेळांव्यतिरिक्त ज्युदो, टेबल टेनिस, रेसलिंग (कुस्ती), सायकलिंग, बास्केटबॉल यासारख्या पर्यायी खेळांचा समावेश आहे. याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी टी20 क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बर्मिंगहॅममध्ये शूटिंगसाठी योग्य त्या सुविधा नसल्यामुळे हा खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षअखेरीस कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट खेळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

1966  मध्ये कॉमनवेल्थ खेळांमध्ये शूटिंगचा समावेश पहिल्यांदा करण्यात आला होता. 1974 नंतर दरवेळी हा खेळ स्पर्धेत असतो.

दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारताला शूटिंगमध्ये सर्वाधिक पदकं मिळाली होती. 14 सुवर्ण, 11 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह भारताने एकूण 30 पदकं पटकावली होती.

प्रत्येक कॉमनवेल्थ खेळांपूर्वी काही क्रीडाप्रकारांचा यामध्ये समावेश केला जातो, तर काही खेळ स्पर्धेतून वगळले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शूटींगऐवजी क्रिकेटचा यंदा समावेश होऊ शकतो.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shooting likely to get excluded from 2022 Commonwealth Games; T20 cricket possibly included latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV