टी-20 मालिकेसाठी नव्या कर्णधारासह द. आफ्रिकेचा संघ जाहीर

18 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा जेपी ड्युमिनीच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

टी-20 मालिकेसाठी नव्या कर्णधारासह द. आफ्रिकेचा संघ जाहीर

केपटाऊन : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने नव्या कर्णधारासह संघाची घोषणा केली आहे. 18 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा जेपी ड्युमिनीच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या जागी ड्युमिनीकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. प्लेसिसला भारताविरुद्धच्या डर्बन वन डेत दुखापत झाली होती. त्यानंतर तो उर्वरित वन डे आणि टी-20 मालिकेतून बाहेर झाला होता.

प्लेसिसच्या जागी वन डेमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा एडन मार्कराम आणि अनुभवी फलंदाज हाशिम आमलाला विश्रांती देण्यात आली आहे. तर विकेटकीपर हेनरिक क्लासेन आणि गोलंदाज ज्युनियर डाला यांना पहिल्यांदाच टी-20 संघात स्थान देण्यात आलं आहे.

फिरकीपटू इम्रान ताहीर, वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल, कॅगिसो रबाडा आणि लुंगिनी एनगिडी यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

संघ :

जेपी ड्युमिनी (कर्णधार), फरहान बेहरदीन, ज्युनियर डाला, एबी डिव्हिलियर्स, रेजा हेंड्रिक्स, ख्रिश्चियन जोंकर, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पेटरसन, एरॉन फांगिसो, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स

संबंधित बातमी :

द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: south Africa announce t 20 team with new captain against India
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV