भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का

भारताविरुद्धच्या मालिकेआधीच द. आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या चार दिवसीय बॉक्सिंग डे-नाईट टेस्टच्या पहिल्याच दिवशी द. आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर क्विंटन डिकॉकला दुखापत झाली आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का

पोर्ट एलिझाबेथ (द. आफ्रिका) : भारताविरुद्धच्या मालिकेआधीच द. आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या चार दिवसीय बॉक्सिंग डे-नाईट टेस्टच्या पहिल्याच दिवशी द. आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर क्विंटन डिकॉकला दुखापत झाली आहे. फलंदाजीवेळी त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे तो नंतर विकेटकिपिंगसाठी देखील मैदानावर आला नाही.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधीच त्याने या कसोटी सामन्यातून माघार घेतल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, त्याची दुखापत नेमकी किती मोठी आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवस तरी त्याला मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. म्हणजेच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीला त्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. जर त्याची दुखापत जास्त गंभीर असेल तर त्याला भारताविरुद्धच्या तीनही कसोटीतून माघार घ्यावी लागू शकते.

भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्याची मालिका 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. याचाच विचार करुन टीम व्यवस्थापनानं डेल स्टेन आणि कर्णधार फॅफ डूप्लेसिसला बॉक्सिंग डे कसोटी न खेळवण्याचा निर्णय घेतला.

द. आफ्रिकेचा धडाकेबाज खेळाडू एबी डिव्हिलिअर्स जवळजवळ दोन वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटीत डिकॉक दुखापतग्रस्त झाल्यानं डिव्हिलिअर्सला विकेटकिपिंगही करावी लागली.

डे-नाईट कसोटीत पहिल्या दिवशी द. आफ्रिकेनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 309 धावांवर आपला डाव घोषित केला. तर त्यानंतर फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेचे 30 धावांमध्ये 4 गडीही बाद केले.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: south african wicket keeper quinton de kock injured latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV