स्टेडियमला डॅरेन सॅमीचं नाव, सेंट लुशियाकडून सन्मान

स्टेडियमला डॅरेन सॅमीचं नाव, सेंट लुशियाकडून सन्मान

कॅस्ट्रिज :  ट्वेन्टी20 विश्वचषक विजेता वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीचा त्याच्या मायदेशानं म्हणजे सेंट लुशियानं खास सन्मान केला आहे. सेंट लुशियाच्या ग्रॉस आयलेटमधील मुख्य स्टेडियम अर्थात बॉसजूर क्रिकेट ग्राऊंडचं 'डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट ग्राऊंड' असं नामकरण करण्यात आलं.

India World T20 Cricket England West Indies


इतंकच नाही, तर 15 हजार क्षमतेच्या या स्टेडियममधील एका स्टँडला वेस्ट इंडीजच्या संघातीला सेंट लुशियाचा सलामीवीर जॉन्सन चार्ल्सचं नाव देण्यात आलं.

India World T20 Cricket England West Indies

सेंट लुशियाचे पंतप्रधान केनी डी अँथनी यांनी मंगळवारी एका खास समारंभात ही घोषणा केली. रविवारी सॅमीच्याच नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडीजच्या संघानं इंग्लंडला हरवून ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्याआधी 2012 साली विंडीजनं पहिल्यांदा ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकला, तेव्हाही सॅमीनंच संघाचं नेतृत्त्व केलं होतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Darren Sammy twenty 20 worldcup
First Published:

Related Stories

LiveTV