मैदानात येऊन शतक ठोकणं विराटची सवय : सचिन

शतकांचं शतक ठोकणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराटचं कौतुक केलं आहे.

मैदानात येऊन शतक ठोकणं विराटची सवय : सचिन

केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अगदी सवयीनुसार केपटाऊन वन डेतही शतक झळकावलं. त्याचं हे वन डे कारकीर्दीतलं 34 वं शतक ठरलं. विराटच्या या शतकाने भारताला 50 षटकांत सहा बाद 303 धावांची मजल मारून दिली.

शतकांचं शतक ठोकणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराटचं कौतुक केलं आहे. मैदानात उतरणं आणि शतक ठोकणं ही विराटची आता नेहमीची सवयच झाली आहे, असं ट्वीट सचिनने केलं आहे.सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या, तर सचिन पहिल्या स्थानावर आहे. सचिनच्या नावावर वन डेत 49 शतकं आहेत, तर विराटही वेगाने हा आकड्या गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Stepping out on the field and scoring centuries has become a regularity for virat tweets sachin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV