या दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं अंडर-19 विश्वचषकात खेळणार!

ऑस्टिन वॉ आणि थांडो एंटिनी यांची अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये निवड करण्यात आली आहे.

या दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं अंडर-19 विश्वचषकात खेळणार!

दुबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एंटिनीचा मुलगा अंडर-19 विश्वचषकात खेळणार आहेत. ऑस्टिन वॉ आणि थांडो एंटिनी यांची अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये निवड करण्यात आली आहे.

ऑस्टिन गेल्या वर्षी अंडर-17 चषकात अंतिम सामन्यात नाबाद 122 धावांची खेळी करुन चर्चेत आला होता. तर थांडोने अंडर 19 संघात वेस्ट इंडिज दौऱ्यात 56 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.

''जगभरातील सर्वोत्कष्ट खेळाडूंमध्ये स्वतःला सिद्ध करुन दाखवणं हे आपलं लक्ष्य आहे. या खेळातील तिन्ही फॉरमॅट हे आपले आवडते आहेत. प्रदर्शनाच्या बळावर स्वतःला कुठपर्यंत नेऊ शकतो, हे पाहायचंय'', असं ऑस्टिन म्हणाला.

आपला दृष्टीकोन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीप्रमाणे असल्याचं थांडो सांगतो. मात्र त्याची खेळण्याची शैली विराट कोहलीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तो डावखुरा फलंदाज आहे, तर उजव्या हाताने गोलंदाजी करतो. क्रिकेटमध्ये वडील मखाया एंटिनी त्याचे आदर्श आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या संघात विल सदरलँडही माजी क्रिकेटर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांचा मुलगा आहे. जेम्स 1993-94 साली ऑस्ट्रेलियाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. विलचा आवडता क्रिकेटर शेन वॉटसन आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Steve Waugh son makhaya ntini son to perform in u 19 world cup
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV