नेहमीच्या शैलीत षटकार, 2 चौकार आणि 3 झेल, रैनाचं दमदार कमबॅक

फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तीन महत्त्वाचे झेल घेत त्याने भारताच्या या विजयात मोलाची भूमिका निभावली.

नेहमीच्या शैलीत षटकार, 2 चौकार आणि 3 झेल, रैनाचं दमदार कमबॅक

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातून फलंदाज सुरेश रैनाने दमदार पुनरागमन साजरं केलं. नेहमीच्याच शैलीत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तीन महत्त्वाचे झेल घेत त्याने भारताच्या या विजयात मोलाची भूमिका निभावली.

फलंदाजीची स्फोटक सुरुवात करत सुरेश रैनाने पुनरागमन साजरं केलं. शिवाय त्याने क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जेपी ड्युमिनीचा पहिलाच झेल त्याने घेतला. त्यानंतर 18 व्या षटकात विकेटकीपर फलंदाज क्लासेनचा झेल घेत रैनाने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीला मिळवल्या.

रैनाने घेतलेला झेल :हे दोन्ही झेल घेतल्यानंतर अखेरच्या षटकातील सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात रैनाने मोलाची भूमिका निभावली. 18 व्या षटकात ख्रिस मॉरिसचा झेल घेऊन रैनाने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अनेक दिवसांनी कमबॅक केल्यानंतर सुरेश रैनाची बॅटही तळपली. रैनाने 7 चेंडूंचाच सामना केला, मात्र या 7 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि एक षटकार ठोकत 15 धावा केल्या.

रैनाचा षटकार :क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: suresh raina shines with 3 catches 2 fours and a six in comeback match
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV