सुरेश रैनाच्या आवाजातील 'बिटिया रानी' सोशल मीडियावर व्हायरल

सुरेशने पत्नी प्रियंकाच्या 'द प्रियंका रैना शो'साठी 'बिटिया रानी' हे गाणं गायलं आहे.

सुरेश रैनाच्या आवाजातील 'बिटिया रानी' सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने मुलींना समर्पित करणारं गाणं गायलं आहे. रैनाने गायलेलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हरभजन सिंग, गौतम गंभीरपासून अनेकांनी त्याच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.

सुरेश रैना सध्या टीम इंडियामध्ये खेळताना दिसत नाही. मात्र मैदानाबाहेर, किंबहुना सोशल मीडियावर तो झळकताना दिसत आहे.
सुरेशने पत्नी प्रियंकाच्या 'द प्रियंका रैना शो'साठी 'बिटिया रानी' हे गाणं गायलं आहे.

Suresh Raina family

सुरेश रैनाच्या आवाजातलं गाणं ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. 'सुरेश रैनाने आपल्या शानदार आवाजात सुंदर गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द खूप छान आहेत' असं हरभजन सिंहने म्हटलं आहे. 'महिला आपलं कुटुंब, समाज आणि देशाचा आधारस्तंभ आहेत. पाठिंबा देण्यासाठी प्रियंका रैना शो ऐका' असं आवाहन इरफान पठाणने केलं आहे.

2015 मध्ये सुरेश रैनाने प्रियंकासोबत लग्नगाठ बांधली होती. 2016 मध्ये त्यांची मुलगी ग्रेशियाचा जन्म झाला.

पाहा व्हिडिओ :

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Suresh raina sings a song bitiya rani for his wife’s show latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV