टी-20 संघात कमबॅक, रैनाची नजर आता विश्वचषकावर

टी-20 मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करत भारतीय वन डे संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

टी-20 संघात कमबॅक, रैनाची नजर आता विश्वचषकावर

केपटाऊन : एका वर्षानंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केल्यानंतर सुरेश रैनाची नजर आता आगामी विश्वचषकावर आहे. टी-20 मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करत भारतीय वन डे संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याने मोठी खेळी केली नाही. मात्र भारताला स्फोटक सुरुवात करुन दिली. शिवाय क्षेत्ररक्षणातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच तो आता वन डे संघातील पुनरागमनाच्या तयारीला लागला आहे.

केपटाऊनमधील तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक लढतीपूर्वी बोलताना सुरेश रैनाने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. ''सर्वात अगोदर ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं आहे. वरच्या फळीतील फलंदाज सध्या चांगली कामगिरी करत आहेत. तर मधल्या फळीतही महेंद्रसिंह धोनी आणि मनीष पांडेने चांगल्या धावा केल्या आहेत,'' असं रैना म्हणाला.

''तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यासाठी विराटने विश्वास दाखवला. पहिल्या सहा षटकांमध्ये धावा करणं गरजेचं असतं आणि आम्ही ते करत आहोत. तिसऱ्या सामन्यातही आमचा हाच प्रयत्न राहील,'' असं तो म्हणाला.

''विराटने वन डे आणि कसोटीतही भारताची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ड्रेसिंग रुममध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. विश्वचषकासाठी आणखी बराच अवधी बाकी असल्याने मी कुठे फीट बसतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी आमच्याकडे श्रीलंकेतील तिरंगी मालिका आणि आयपीएल आहे,'' असं रैना म्हणाला.

''वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा असतो. जेव्हाही संधी मिळते तेव्हा मी नेहमीच नैसर्गिक खेळी करतोच आणि त्यानंतर स्वतःच्या खेळाचं आकलनही करतो. आता माझ्यासाठी भारताचा प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे,'' असं रैनाने सांगितलं.

''दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा समारोप विजयाने करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचंही रैनाने सांगितलं. विराट कोणतीही गोष्ट एवढ्या सहजपणे घेत नाही. बैठकीत आमची यावरही चर्चा झाली. आमच्याकडे मार्गदर्शनासाठी रवी शास्त्री आणि धोनी यांच्यासारखे दिग्गज आहेत. त्यामुळे नक्कीच विजयी समारोप करु,'' अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Suresh raina’s e
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV