भारत सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत

या कसोटीत भारतीय संघाने विजयासोबत आणखी मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

भारत सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत

कोलंबो : श्रीलंकेने कोलंबो कसोटी वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात केलेला कठोर संघर्ष अखेर अयशस्वी ठरला. टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसरा डाव 386 धावांत रोखून, कोलंबो कसोटीत एक डाव आणि 53 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली. जाडेजा आणि अश्विन या दोघांनीही प्रत्येकी 7 विकेट घेतल्या.

भारतीय फलंदाजांनीही या कसोटीत चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केला होता. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी खेळी आणि अश्विन, जाडेजाच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने मोठी मजल मारली.

पुजारा 133 आणि अजिंक्य रहाणे 132 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या अश्विन आणि साहा आणि जाडेजाने अर्धशतकं झळकावत टीम इंडियाला 600 धावांचा टप्पा पार करुन दिला.

या कसोटीत भारतीय संघाने विजयासोबत आणखी मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

सर्वाधिक वेळा सलग कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड भारताच्या पुढे आहेत. इंग्लंडने 1884 ते 1898 या काळात सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या.

त्यानंतर जवळपास 116 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात 2005-06 ते 2008 या काळात सलग 9 कसोटी मालिकांवर आपलं नाव कोरलं.

आता 125 वर्षांनंतर सलग 8 कसोटी मालिका जिंकून भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 2015 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरुन या विजय रथावर स्वार झाला. त्यानतंर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेला भारताने पराभवाची धूळ चारली.

विशेष म्हणजे या सर्व कसोटी मालिका भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV