बांगलादेशचा धुव्वा उडवत टीम इंडिया विजयी

धवननं सुरेश रैनाच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला.

By: | Last Updated: 08 Mar 2018 10:56 PM
बांगलादेशचा धुव्वा उडवत टीम इंडिया विजयी

कोलंबो : टीम इंडियानं बांगलादेशचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून, ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आपलं आव्हान कायम राखलं. श्रीलंकेतल्या कोलंबोत या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला आठ बाद 139 धावांत रोखून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. मग शिखर धवननं 55 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं. त्यानं ही खेळी पाच चौकार आणि दोन षटकारांनी सजवली.

धवननं सुरेश रैनाच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला.

त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला वीस षटकांत 8 बाद 139 धावांत रोखलं. भारताकडून जयदेव उनाडकटनं 38 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. विजय शंकरनं दोन, तर यजुवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एकेक विकेट काढली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ndia beat Bangladesh by 6 wickets in the second T20I
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV