कसोटी, वन डेनंतर टी-20 मालिकाही खिशात, भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

कसोटी, वन डेनंतर टी-20 मालिकाही खिशात, भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्च्या तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

श्रीलंकेने दिलेलं 136 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकात चार चेंडू राखून पूर्ण केलं. भारताकडून मनीष पांडेने चौकारांसह 32 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 आणि कर्णधार रोहित शर्माने 27 धावांचं योगदान दिलं.

त्याआधी टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकात  सात बाद 135 धावांची मजल मारली होती. मध्यमगती गोलंदाज जयदेव उनादकट आणि हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली.

टीम इंडियाने श्रीलंकेला याअगोदर वन डेत आणि कसोटी मालिकेतही पराभवाची धूळ चारली होती. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. तर तीन सामन्यांच्याच कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर 1-0 ने मात केली होती. या मालिकेतील दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.

भारताने 2017 मध्ये श्रीलंकेवर तिन्ही फॉरमॅटमध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. श्रीलंकेत झालेल्या तिन्ही फॉरमॅटमधील मालिकेत भारताने 9-0 ने विजय मिळवला होता. तर भारतातील तिन्ही फॉरमॅटमध्ये 6-1 ने विजय मिळवला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Team India beat srilanka by 5 wickets in third t20 match
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV