आयसीसी रँकिंगमध्ये कसोटीसह वन डेतही टीम इंडिया नंबर वन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलं.

आयसीसी रँकिंगमध्ये कसोटीसह वन डेतही टीम इंडिया नंबर वन

इंदूर : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंदूरच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

या विजयासोबतच टीम इंडिया आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान झाली आहे. 2014 नंतर टीम इंडियाने आपली जागा पुन्हा मिळवली. अगोदरपासूनच कसोटीत अव्वल असणाऱ्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं.

इंदूर वन डेपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या नावावर प्रत्येकी 119 गुण होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या खात्यात आणखी एका गुणाची भर पडून 120 गुण झाले. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलं.

आयसीसी वन डे रँकिंगमध्ये आता भारत 120 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका (119), ऑस्ट्रेलिया (114), इंग्लंड (113) आणि न्यूझीलंड 111 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

संबंधित बातमी : ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स राखून मात, वन डे मालिकाही भारताच्या खिशात

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV