टी-20 मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

मॉईजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड याच्या तडाखेबंद शतकी भागिदारीनं ऑस्ट्रेलियायाला दुसऱ्या ट्वेंटी ट्वेन्टी सामन्यात 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.

Team India ready for Hyderabad T 20 match latest updates

मुंबई : गुवाहाटीतील या सामन्यानंतर उभय संघ हैदराबादच्या रणांगणात  तिसऱ्या आणि अंतिम ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आमनेसामने येतायत. यावेळी मात्र विराटचा संघ हा सामना जिंकून  मालिकाविजयासाठी आसुसलेला असेल.

मॉईजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड याच्या तडाखेबंद शतकी भागिदारीनं ऑस्ट्रेलियायाला दुसऱ्या ट्वेंटी ट्वेन्टी सामन्यात  8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.

गुवाहाटीच्या सामन्यात आधी भारतीय फलंदाजांचं अपयश आणि त्यानंतर गोलंदाजांची खराब कामगिरी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली.  त्यात  जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या  सुरुवातीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, मनीष पांडेसारखे खंदे शिलेदार केवळ 27 धावात तंबूत परतल्यानं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  त्यानंतर गोलंदाजांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे केवळ 119 धावांचं माफक लक्ष्य कंगारुनी 15 षटकं आणि तीन चेंडूतच पार केल. तेही केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात. कांगारुंच्या या विजयानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे त्यामुळे हैदराबादची लढत दोन्ही संघाच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान आजवर 5 ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका झाल्या आहेत. त्यात तीन वेळा भारतानं आणि एकदा ऑस्ट्रेलियानं बाजी मारली आहे. तर उभय संघामधील एक मालिका अनिर्णित राहिली आहे. 2015-16 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी ट्वेन्टी मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-0 अशी धूळ चारली होती. आकडेवारी पाहता भारताची कामगिरी उजवी वाटत असली मागील सामन्यातील अपयश  चिंतेची बाब ठरू शकते.

यावर्षी भारतानं कांगारुंना कसोटी मालिकेत 2-1 तर वन डेत 4-1 अशी मात दिलीये. ट्वेंटी ट्वेन्टी तही विराट आणि शिलेदारांकडून अशाच मालिका विजयाची अपेक्षा केली जातेय. त्यामुळे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी हैदराबादच्या अंतिम  आणि निर्णायक लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली तर टीम इंडियाला मालिकविजयापासून रोखणं शक्य नाही.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Team India ready for Hyderabad T 20 match latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आशिया चषकाचं विजेतेपद भारताकडे, मलेशियावर 2-1 ने मात
आशिया चषकाचं विजेतेपद भारताकडे, मलेशियावर 2-1 ने मात

ढाका : भारतीय हॉकी संघाने मलेशियावर 2-1 अशी मात करून आशिया चषकावर आपलं

200 वन डे, 31 शतकं, विराटने पॉन्टिंगला मागे टाकलं
200 वन डे, 31 शतकं, विराटने पॉन्टिंगला मागे टाकलं

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या

IND vs NZ : टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी
IND vs NZ : टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिकेतील पहिल्या सामन्याला

होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?
होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?

मुंबई : सलामीवीर शिखर धवनचं पुनरागमन झाल्यामुळे मुंबईकर फलंदाज

आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानवर सलग दुसरा विजय
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानवर सलग दुसरा...

ढाका : भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवून आशिया

रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज : विराट कोहली
रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज : विराट कोहली

मुंबई : दमदार फॉर्मात असणारा अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा तिसरा

दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत देणाऱ्या श्रीशांतला BCCIचं उत्तर
दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत देणाऱ्या श्रीशांतला BCCIचं उत्तर

दुबई : पुन्हा आजन्म बंदी घातल्यानंतर क्रिकेटर एस.श्रीशांतने

तो माझा शेवटचा सामना असेल: अश्विन
तो माझा शेवटचा सामना असेल: अश्विन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने  मोठा निर्णय जाहीर

सचिनकडून सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा'
सचिनकडून सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा'

मुंबई : टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आज आपला 39वा वाढदिवस

15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी
15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी

पार्ल : कर्णधारपद सोडल्यानंतर पहिलाच सामना खेळणारा दक्षिण