केवळ दोनच मिनिटं शॉवर, द.आफ्रिकेत टीम इंडियाला सूचना

प्रखर सूर्यप्रकाशात मैदानावर सराव करुन घामेजलेल्या अंगाने हॉटेलवर परतलेल्या टीम इंडियाला या सूचना मिळाल्या.

केवळ दोनच मिनिटं शॉवर, द.आफ्रिकेत टीम इंडियाला सूचना

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका : आंघोळ करताना दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेऊ नका, अशा सूचना टीम इंडियाला देण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंना स्थानिक प्रशासनाकडून हे नियम जारी करण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश शहरांना सध्या दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केपटाऊन शहराच्या स्थानिक प्रशासनानं सर्व नागरिकांना एका दिवसाला 87 लीटरपेक्षा जास्त पाणी वापरण्यास मनाई केली आहे. याचीच झळ भारतीय खेळाडूंनाही बसली आहे.

कसोटी मालिका आफ्रिकेने जिंकली, तरीही भारत 'हरणार' नाहीच


प्रखर सूर्यप्रकाशात मैदानावर सराव करुन घामेजलेल्या अंगाने हॉटेलवर परतलेल्या टीम इंडियाला या सूचना मिळाल्या. टीम इंडियातील खेळाडू भारताच्या विविध भागातून आल्यामुळे त्यांनाही दुष्काळी परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे सर्वच जण आपापल्या परीनं दोन मिनिटांत आंघोळ आटोपून सूचनेचं पालन करुन सहकार्य करत आहेत.

क्रिकेट माझ्या रक्तात, लग्नानंतर पहिल्या मॅचबाबत विराटचं उत्तर


दक्षिण आफ्रिकेत हिवाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त कोरडं असलेलं हवामान, भूजलाची घटलेली पातळी, धरणांमधील कमी होणारा पाणीसाठा अशा परिस्थितीचा सामना केप टाऊन शहराला करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावर 'लेव्हल 6'चे निर्बंध घालण्यात आले आहेत. हे नियम मोडल्यास 10 हजार रँड्स (सुमारे 51 हजार रुपये) दंड ठोठावला जाऊ शकतो.

जाडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार?


सध्या भारतीय संघ तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. उद्यापासून (5 जानेवारी) दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Team India told not to use shower more than two minutes in drought-hit Cape town latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV