भारताने इतिहास रचला, द. आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय

टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.

भारताने इतिहास रचला, द. आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय

पोर्ट एलिझाबेथ : विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 275 धावांचं आव्हान दिलं होतं. हाशिम अमलाने एक खिंड लढवून दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी संघर्ष केला. पण तो 71 धावांत धावचीत झाला आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 57 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.

भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावूनही टीम इंडियाला 50 षटकांत सात बाद 274 धावांचीच मजल मारता आली. रोहितने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं. त्याने 126 चेंडूंमधली 115 धावांची खेळी अकरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली.

रोहितने शिखर धवनच्या साथीने 48 धावांची सलामी दिली. मग त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.

25 वर्षात पहिला मालिका विजय

  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने आघाडीवर

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: team India vs south Africa port Elizabeth one day live updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV