IndvsSA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा 63 धावांनी विजय

विराट कोहलीच्या टीम इंडियानं जोहान्सबर्ग कसोटीला नाट्यमय कलाटणी देऊन, दक्षिण आफ्रिकेवर 63 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे.

IndvsSA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा 63 धावांनी विजय

जोहान्सबर्ग : विराट कोहलीच्या टीम इंडियानं जोहान्सबर्ग कसोटीला नाट्यमय कलाटणी देऊन, दक्षिण आफ्रिकेवर 63 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे.

या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना डिन एल्गर आणि हाशिम अमलानं दक्षिण आफ्रिकेला एक बाद 124 धावांची दमदार मजल मारून दिली होती. त्याच धावसंख्येवर ईशांत शर्मानं अमलाचा काटा काढला आणि मोहम्मद शमीनं दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीची फळी कापून काढली.

शमीनं 28 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारतानं जोहान्सबर्ग कसोटी जिंकल्यामुळं, दक्षिण आफ्रिकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा विजयावर समाधान मानावं लागलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: team india won 3rd test match by 63 runs with south africa latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV