सोळावं ग्रँड स्लॅम नदालचं

स्पॅनिश बुलनं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 2010 साली आणि मग 2013 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा त्यानं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकून, आपल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या 'स्वीट सिक्सटिन'वर नेली.

Tennis star Nadal’s 16th Grand slam latest update

मुंबई : जागतिक क्रमवारीतला ‘नंबर वन’ राफेल नदाल नंबर वनसारखाच खेळला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव हा अटळ ठरला. त्यानं पराभव टाळण्यासाठी तब्बल अडीच तास संघर्ष केला खरा, पण अखेर सरशी नदालचीच झाली. राफेल नदालनं केविन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 असा धुव्वा उडवून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं.

स्पॅनिश बुलनं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 2010 साली आणि मग 2013 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा त्यानं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकून, आपल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या ‘स्वीट सिक्सटिन’वर नेली.

नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं यंदाच्या मोसमातलं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानं आणि रॉजर फेडररनं  मोसमातली दोन-दोन ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावून व्यावसायिक टेनिसवरचं आपलं वर्चस्व अबाधित राखलं.

नदालनं फ्रेन्च ओपन आणि अमेरिकन ओपन जिंकली, तर फेडररनं विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन. यंदाच्या मोसमातलं हे दुहेरी ग्रँड स्लॅम यश नदालला समाधानकारक वाटतं. कारण ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही त्यानं फायनलमध्ये धडक मारली होती. नदालचं विम्बल्डनमधलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं असलं तरी, त्यानं पराभव टाळण्यासाठी पाच सेट्स संघर्ष केला.

नदालच्या अमेरिकन ओपनमधल्या विजेतेपदानं त्याची आणि फेडररची सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांची शर्यत आता आणखी तीव्र झाली आहे. 36 वर्षांच्या फेडररच्या खजिन्यात आजवर 19 ग्रँड स्लॅम विजेतीपदं आहेत, तर 31 वर्षांच्या नदालच्या शोकेसमध्ये आता 16 ग्रँड स्लॅम विजेतीपदं झाली आहेत.

त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर नदाल म्हणतो की, सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या शर्यतीत फेडररला गाठणं हे माझं मुख्य उद्दिष्ट नाहीय. फेडररशी स्पर्धा करण्याचा मी कधीच विचार केला नाही. मी माझ्या शैलीनं खेळतो. तो त्याच्या शैलीनं. त्याच्या आणि माझ्यामधला तीन ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा फरक माझ्या दृष्टीनं फार मोठा नाही. पण आम्ही दोघं आणखी किती वर्ष खेळत राहतो, ही माझ्या दृष्टीनं उत्सुकता आहे.

राफेल नदाल म्हणतो, त्यानुसार तो आणि फेडरर आणखी किती वर्षे खेळत राहणार ही जशी त्याची उत्सुकता आहे, तशीच ती टेनिसविश्वाचीही उत्सुकता आहे. कारण या घडीला व्यावसायिक टेनिसचं भावविश्व हे नदाल आणि फेडरर या दोन आधारस्तंभावरच उभं आहे.

2003 सालच्या विम्बल्डनपासून आजच्या अमेरिकन ओपनपर्यंत, 58 पैकी मोजून 35 ग्रँड स्लॅम विजेतेपदं ही त्या दोघांनीच वाटून घेतली आहेत. नदाल आणि फेडररची ही मक्तेदारी आणि त्या दोघांमधली निकोप स्पर्धा व्यावसायिक टेनिसला अधिकाधिक समृद्ध करणार आहे.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Tennis star Nadal’s 16th Grand slam latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

कोलकाता : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलकात्याच्या दुसऱ्या वन

भारताच्या ‘चायनामन’ची ऑस्ट्रेलियाविरोधात हॅटट्रिक
भारताच्या ‘चायनामन’ची ऑस्ट्रेलियाविरोधात हॅटट्रिक

कोलकाता : भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं कोलकात्याच्या

#IndVsAus : कोलकाता वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 253 धावांचं आव्हान
#IndVsAus : कोलकाता वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 253 धावांचं आव्हान

कोलकाता : टीम इंडियानं कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाला

मला पुरुष म्हणून हिणवायचे, सेरेनाचं आईला भावनिक पत्र
मला पुरुष म्हणून हिणवायचे, सेरेनाचं आईला भावनिक पत्र

मुंबई : टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने तिच्या आईला लिहिलेलं

‘महेंद्रसिंह धोनी 2023चा विश्वचषक देखील खेळेल’
‘महेंद्रसिंह धोनी 2023चा विश्वचषक देखील खेळेल’

मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या

 कपिल देव, द्रविडसह या क्रिकेटर्सचा आतापर्यंत 'पद्मभूषण'ने सन्मान
कपिल देव, द्रविडसह या क्रिकेटर्सचा आतापर्यंत 'पद्मभूषण'ने सन्मान

नवी दिल्ली : ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी

माझ्या गोलंदाजीवर खेळताना वॉर्नर दबावात होता : कुलदीप यादव
माझ्या गोलंदाजीवर खेळताना वॉर्नर दबावात होता : कुलदीप यादव

कोलकाता : टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची

भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वन डेसाठी ईडन गार्डन्स सज्ज
भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वन डेसाठी ईडन गार्डन्स सज्ज

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या

'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस
'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस

मुंबई : ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी

इंग्लंडची विंडीजवर मात, श्रीलंका थेट विश्वचषक 2019 साठी पात्र
इंग्लंडची विंडीजवर मात, श्रीलंका थेट विश्वचषक 2019 साठी पात्र

मुंबई : 2019 च्या क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणारा श्रीलंका हा