... म्हणून आम्ही जिंकलो : रॉस टेलर

भारतीय गोलंदाजांवरील दबाव वाढवण्यात यशस्वी झाल्यामुळे विजय मिळाला, असं रॉस टेलरने सांगितलं.

... म्हणून आम्ही जिंकलो : रॉस टेलर

मुंबई : न्यूझीलंडचा शतकवीर फलंदाज टॉम लॅथमने स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा सल्ला ऐकला. ज्यामुळे भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांची लय बिघडली, असं न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने सांगितलं.

रॉस टेलरने 95 धावा केल्या आणि लॅथमसोबत 200 धावांची अभेद्य भागीदारी रचली. ज्यामुळे टीम इंडियाने दिलेलं 281 धावांचं लक्ष्य सहजपणे पार करता आलं. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेला हा सामना न्यूझीलंडने 6 विकेट्सने जिंकला.

सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर


स्वीप शॉट खेळल्यामुळे फिरकीपटूंवर दबाव वाढवण्यात यश मिळालं. लॅथमने दमदार फलंदाजी केली. त्याला स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा सल्ला दिला होता आणि त्याने तो ऐकला, असं रॉस टेलर सामन्यानंतर बोलताना म्हणाला.

रॉस टेलर-लॅथमची अभेद्य भागीदारी, न्यूझीलंडचा 6 विकेटने विजय


साडे तीन तास क्षेत्ररक्षण केल्यानंतर न्यूझीलंडला चांगल्या सुरुवातीची गरज होती. या मैदानावर न्यूझीलंडला नेहमीच संघर्ष करावा लागतो. पण सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टील आणि कूलिन मुनरो यांनी चांगली सुरुवात केली. मागील भारत दौरा आणि आयपीएलचा फायदा झाला, असंही रॉस टेलर म्हणाला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV