मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

मोहम्मद शमीप्रकरणी बीसीसीआय आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. पण बीसीसआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

मुंबई : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां हिने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत हसीन जहांने शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही फेसबुकवर शेअर केले आहेत. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया:

या संपूर्ण प्रकरणी बीसीसीआय आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. पण बीसीसआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, 'ही त्यांची खासगी बाब आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही पडता कामा नये. तसंच सध्यातरी त्याच्याविरुद्ध कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. त्याच्यावर कोणतेही आरोप निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही त्यांची अंतर्गत बाब आहे. पण याप्रकरणी जर पोलीस तक्रार नोंदवण्यात आली तर आम्ही देखील आमच्या नियमानुसार कारवाई करु.'

दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून प्रतिक्रिया देण्यास नकार:

आयपीएलच्या 11व्या मोसमात शमी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. पण आयपीएलच्या तोंडावरच हे प्रकरण समोर आल्याने शमीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही सध्या तरी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज (बुधवार) सकाळी 11 वाजता दिल्ली डेअरडेव्हिल्सची पत्रकार परिषदही आहे. त्यामुळे यावेळी ते याबाबत काही वक्तव्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने 3 कोटीमध्ये शमीला खरेदी केलं आहे.अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. मोहम्मद शमी सध्या धर्मशालामध्ये आहे.

शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीन जहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं.

27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे.

पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख?

हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावं स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही हसीनजहांने केला आहे.

एक तरुणी 'आय मिस यू' असा मेसेज शमीला करते, त्यावर 'कम टू माय रुम' असा रिप्लाय तो करताना दिसत आहे.हसीनजहांचे आरोप

मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहांने अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला. शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा हसीन जहांने केला.

'शमी अनेक महिलांसोबत अश्लील चॅट करायचा. जेव्हा त्याचा फोन माझ्या हाती लागला, तेव्हा तो 'लॉक' होता. मात्र वेगवेगळे पॅटर्न्स वापरल्यावर अखेर फोन अनलॉक झाला. अखेर मला या गोष्टींचा उलगडा झाला. शमीचे सगळे कॉल डिटेल्स आणि स्क्रीनशॉट्स माझ्या हाती लागले. आपला फोन गायब झाल्याचं समजताच तो चांगलाच भडकला होता.' असंही हसीन जहांने 'एबीपी'शी बोलताना सांगितलं.

फेसबुक वॉलवरुन या पोस्ट डीलीट कराव्यात, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचंही हसीन जहांने सांगितलं.

8 जानेवारीला काय झालं?

'उत्तर प्रदेशमध्ये मला मारहाण केली जायची. माझं मानसिक आणि शारीरिक शोषण व्हायचं. शमीचं पूर्ण कुटुंब मला शिवीगाळ करत असे. सूर्योदयापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हा प्रकार चालायचा', असं तिने सांगितलं.

जाधवपूर पोलिसात हिंसाचाराची माहिती दिली. 'कदाचित त्याच्या कुटुंबाने माझी हत्याही केली असती. त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्नही केला' असं हसीन जहां सांगते.

'मी अजूनही पोलिसात तक्रार दिलेली नाही. 8 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये मी घरगुती हिसांचाराची बळी पडले. त्यानंतर मी कोलकात्याला गेले आणि स्थानिक पोलिसात माहिती दिली. अद्यापही कायदेशीर कारवाईबाबत मी विचार करत आहे' अशी माहिती हसीन जहांने दिली.

संंबंधित बातम्या :

अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: top BCCI official comments on allegations against Mohd Shami by his wife latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV