विराट-अनुष्काच्या शॉपिंगचा फोटो व्हायरल, ट्विपल्सकडून खिल्ली

केपटाऊनमधील विराट आणि अनुष्काच्या शॉपिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट-अनुष्काच्या शॉपिंगचा फोटो व्हायरल, ट्विपल्सकडून खिल्ली

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी, वन डे, आणि ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ केपटाऊनमध्ये पोहोचला आहे. इथे पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत शॉपिंग करताना दिसला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधील पहिला कसोटी सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. मालिकेला सुरुवात झाल्यानंतर विराट व्यस्त होऊन जाईल, त्यामुळे अनुष्कासोबत वेळ घालवण्यासाठी विराट तिला घेऊन शॉपिंगला गेला.

केपटाऊनमधील विराट आणि अनुष्काच्या शॉपिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विरुष्का एका दुकानाबाहेर उभे असून, तिथे 50 टक्के सेलचं बोर्ड आहे.

या फोटोबाबत ट्विटर युजर्स विराट आणि अनुष्काची खिल्ली उडवत आहेत. त्यांचा फोटो शेअर करताना @shailimore या युझरने म्हटलं आहे की, "विराट अनुष्काला : आता रिसेप्शनला एवढे पैसे खर्च केल्यानंतर सेलमध्ये शॉपिंग करावं लागेल ना, डार्लिंग."@IdioticWorld हॅण्डलवरुन ट्वीट केलं आहे की,
"विराट कोहलीची संपत्ती : 7.1 मिलियन डॉलर
अनुष्का शर्माची संपत्ती : 3.2 मिलिय डॉलर
तरीही 50 टक्के डिस्काऊंटमध्ये शॉपिंग करत आहेत ."

"विराट कोहली : हे बघ अनुष्का, मी 50% वाला नाही, मी 100% वाला मेंबर आहे," असं ट्वीट @Madan_Chikna नावाच्या ट्विवटर हॅण्डलवर केलं आहे.तर @Goddamittt हॅण्डलवर लिहिलं आहे की?,
"वेडिंग प्लॅनरकडून मिळालेल्या बिलकडे विराट कोहली पाहतो.
अनुष्का : बेबी, चल शॉपिंगला जाऊया.
विराट : मला योग्य ठिकाण माहित आहे."सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Twiples troll Anushka and Virat Kohli over shopping in 50 percent sale at Cape Town
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV