12 वर्षीय भारतीय क्रिकेटरचा श्रीलंकेत स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

भारताच्या अंडर-17 संघातील 12 वर्षाच्या क्रिकेटरचा श्रीलंकेत स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

12 वर्षीय भारतीय क्रिकेटरचा श्रीलंकेत स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

कोलंबो : श्रीलंकेत अंडर-17 क्रिकेट मालिकेसाठी गेलेल्या एका भारतीय क्रिकेटरचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंडर-17 मालिकेसाठी 19 सदस्यांसह 12 वर्षीय क्रिकेटर श्रीलंकेचा दौऱ्यावर गेला होता. पण तिथं एका बीच रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये पोहताना त्याचा मृत्यू झाला.

श्रीलंकेतील पमुनुगमामधील हॉटेलातील स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना 12 वर्षीय क्रिकेटर अचानक बुडला. त्यानंतर त्याला तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हा खेळाडू गुजरातमधील असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेची श्रीलंका पोलीस कसून चौकशी करत आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV