उन्मुक्तच्या जबड्याला दुखापत, तरीही मैदानात उतरुन शतकी खेळी

सामना सुरु होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना त्याच्या जबड्याला दुखापत झाली होती.

उन्मुक्तच्या जबड्याला दुखापत, तरीही मैदानात उतरुन शतकी खेळी

नवी दिल्ली : एकीकडे भारतीय अंडर-19 संघाने विश्वचषक जिंकल्यामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदच्याही धैर्यशील खेळीचं कौतुक होत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ही कामगिरी केली.

2012 साली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद जबड्याला गंभीर दुखापत असतानाही मैदानात उतरला. स्वतःची कसलीही पर्वा न करता त्याने शतकी खेळी केली आणि दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीने पहिल्याच सामन्यात उत्तर प्रदेशवर 55 धावांनी मात केली.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना उन्मुक्त चंदच्या 116 धावांच्या खेळीच्या जोरावर 6 बाद 307 धावा केल्या. उन्मुक्त चंदने 125 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. सामना सुरु होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना त्याच्या जबड्याला दुखापत झाली होती.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: unmukt chand hits century with his
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: unmukt chand उन्मुक्त चंद
First Published:
LiveTV