बोल्टच्या सोनेरी कारकीर्दीची चटका लावणारी अखेर

लंडनच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्ट फोर बाय हंड्रेड मीटर्स रिले या शर्यतीची फायनल पूर्णही करू शकला नाही.

By: | Last Updated: > Sunday, 13 August 2017 3:38 PM
Usain Bolt final race ends with injury latest updates

लंडन : वेगाचा राजा अशी ओळख मिळवलेल्या युसेन बोल्टच्या कारकीर्दीची आज वेदनादायी अखेर झाली. लंडनच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्ट फोर बाय हंड्रेड मीटर्स रिले या शर्यतीची फायनल पूर्णही करू शकला नाही.

बोल्टच्या डाव्या मांडीचा स्नायू अचानक दुखावल्यानं, तो रिले शर्यतीच्या अखेरच्या लॅपमध्ये कळवळून खाली कोसळला. त्यामुळं जमैकाच्या चौकडीला या शर्यतीतून पदकाविनाच माघारी परतावं लागलं.

बोल्टनं योहान ब्लेककडून बॅटन स्वीकारून अखेरच्या लॅपमध्ये मुसुंडी मारली होती. पण डाव्या मांडीतल्या असह्य वेदनांमुळं तो काही क्षणातच कळवळून ट्रॅकवर कोसळला.

लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममधलं ते दृश्य जगभरच्या अॅथलेटिक्स चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं. वेदनांनी कळवळणारा बोल्ट काही क्षण ट्रॅकवरच पडून होता. मग योहान ब्लेक, ज्युलियन फोर्टे आणि ओमार मॅकलोड या सहकाऱ्यांनी जाऊन त्याला सावरलं. त्यामुळं बोल्टला 100 मीटर्स शर्यतीतल्या ब्राँझपदकानंच जागतिक अॅथलेटिक्सचा निरोप घ्यावा लागला.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Usain Bolt final race ends with injury latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

टीम इंडियाला जादू की झप्पी, सचिनचं ट्वीट
टीम इंडियाला जादू की झप्पी, सचिनचं ट्वीट

कॅण्डी (श्रीलंका): विराट कोहलीच्या टीम इंडियानं गॉल आणि कोलंबो

INDvsSL : भारताचा लंकेवर मालिका विजय, 85 वर्षांनी इतिहास रचला
INDvsSL : भारताचा लंकेवर मालिका विजय, 85 वर्षांनी इतिहास रचला

कॅण्डी : विराट कोहलीच्या टीम इंडियाने गॉल आणि कोलंबो कसोटी

मी धोनीकडून बरंच काही शिकलो : हार्दिक पंड्या
मी धोनीकडून बरंच काही शिकलो : हार्दिक पंड्या

कॅण्डी : पहिल्याच कसोटी मालिकेत वादळी शतक झळकावणारा टीम इंडियाचा

टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, काय आहे ‘Daddy D’ pose?
टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, काय आहे ‘Daddy D’ pose?

मुंबई : भारतीय संघाची नवीन सेलिब्रेशन स्टाईल सध्या जोरदार चर्चेत

''धोनीला पर्याय नाही, मात्र युवराजच्या जागेसाठी अनेक दावेदार''
''धोनीला पर्याय नाही, मात्र युवराजच्या जागेसाठी अनेक दावेदार''

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-20 साठी भारतीय

धोनीला जेव्हा वाटेल तेव्हाच तो निवृत्ती घेईल : हसी
धोनीला जेव्हा वाटेल तेव्हाच तो निवृत्ती घेईल : हसी

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज माइक हसी सध्या भारतातील

हार्दिक पंड्या भविष्यातील कपिल देव : एमएसके प्रसाद
हार्दिक पंड्या भविष्यातील कपिल देव : एमएसके प्रसाद

नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्यामध्ये भारताचे

भारत वि. श्रीलंका : वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
भारत वि. श्रीलंका : वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी

कँडी कसोटीत हार्दिक पंड्याचं झंझावाती शतक, श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की
कँडी कसोटीत हार्दिक पंड्याचं झंझावाती शतक, श्रीलंकेवर फॉलोऑनची...

कँडी(श्रीलंका) : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा

भारतीय गोलंदाजांकडून श्रीलंकेचा अवघ्या 135 धावांत खुर्दा
भारतीय गोलंदाजांकडून श्रीलंकेचा अवघ्या 135 धावांत खुर्दा

पल्लीकल : कॅण्डी : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत