उपकर्णधारच संघाबाहेर, आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत रहाणेला स्थान नाही

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाच संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. त्याऐवजी रोहित शर्माला स्थान देण्यात आलं आहे.

उपकर्णधारच संघाबाहेर, आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत रहाणेला स्थान नाही

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाच संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. त्याऐवजी रोहित शर्माला स्थान देण्यात आलं आहे. यावेळी संघात अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही संधी  देण्यात आलं आहे.

रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. पण गेल्या काही मालिकांमध्ये रहाणेला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या 14 कसोटीत रहाणेनं 26.82च्या सरासरीनं फक्त 617 धावा केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात बरेच बदल केले जात आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असावा. आतापर्यंत परदेशात रहाणेची कामगिरी तशी चांगली आहे. पण मागील काही कसोटी सामन्यातील सुमार कामगिरीचा त्याला फटका बसला आहे. रहाणेसोबतच फंलदाज लोकेश राहुल, रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्माला देखील संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

प्लेईंग इलेव्हन : शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, रिद्धीमान साहा (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: vice captain is out of the team Rahane does not have a place in the Test against South Africa latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV