झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये ‘विरानुष्का’चा डान्स

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी 23 नोव्हेंबरला रिजिस्टर मॅरेज करुन सर्वांनाच धक्का दिला होता.

झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये ‘विरानुष्का’चा डान्स

मुंबई : झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या रिसेप्शनमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, आशिष नेहरा, युवराज सिंह, अजित आगरकर यांसह अनेक आजी-माजी क्रिकेटर हजर होते. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या ‘विरानुष्का’ या जोडीवर.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ग्रे कलरचा सूट परिधान केला होता, तर अनुष्काने ग्रे आणि सिल्व्हर कलरचे कपडे परिधान केले होत. या दोघांनी झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनदरम्यान डान्सही केला. विराट आणि अनुष्काने यावेळी ‘दिल धडकने दो’मधील ‘गल्ला गोरियाँ’ या गाण्यावर ठेका धरला. विराट-अनुष्कासोबतच अनेक सेलिब्रिटींनी डान्स केला.

रिसेप्शन पार्टीत झहीर आणि सागरिका घाटगे अत्यंत सुंदर दिसत होते. झहीरने यावेळी रॉयल ब्ल्यू कलरचा कुर्ता आणि सागरिकाने गोल्डन ब्ल्यू कलरचे कपडे परिधान केले होते.

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी 23 नोव्हेंबरला रिजिस्टर मॅरेज करुन सर्वांनाच धक्का दिला होता.

पाहा व्हिडीओ :

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Viranushka’s dance in Zahir and Sagarika’s reception latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV